Dear आयुष्या
आज तुझ्याशी खुप बोलावं वाटत होतं म्हणून पत्र लिहते आहे. तुझ्या आणि माझ्या प्रवासा बद्दल तर तुला सगळंच माहिती आहे, कितीतरी गोष्टी घडल्या ना आजवरच्या प्रवासात... चांगल्या- वाईट, कडू -गोड. अजिबात सोपं नव्हत हा तुला जगणं पण तू खंबीर होतास म्हणून मी आहे.
तुला माहिती आहे काल- परवा ना मला कोणीतरी विचारलं...तुझ्या आयुष्यातील अवस्मरणीय क्षण कोणता...?
काय उत्तर देऊ काहीच सुचेना, मी ही विचार करू लागले की इतक्या वर्षाचं आपलं आयुष्य त्यात असे कित्येक क्षण आपण जगलो जे कधीच विसरता येणार नाही...काय बरं उत्तर देऊ? असंच सारखं वाटत होतं. मग मी अलगद डोळे मिटले आणि, सगळे क्षण आठवू लागले... आठवत असताना अचानकच माझ्या मुखातून निघालं... "जेव्हा मी पहिल्यांदा लेखणी हातात घेतली तो क्षण"....हो, तुला तर आठवत असेल ना....मी जेव्हा ठरवलं होतं, चला आपणही एक तोडकी- मोडकी कविता लिहून पहावी.
मी लेखणी हातात घेतली तेव्हा मनाला खुप हुरहुर लागली होती....आपल्याला जमेल का नाही?, आपण लिहू शकणार का नाही?. असे अनेक प्रश्न माझ्या मनात होते...पण, जेव्हा मी लिहायला सुरुवात केली, मला ही कळले नाही की मी कधी एका वेगळ्याच जगात हरवले, मन माझे जणू पाखरू होऊन उंच आकाशी उडाले होते.
लेखणी हाती घेतली तो क्षण आयुष्यात कधी विसरू शकणार नाही... मला एक नवी आणि वेगळी ओळख फक्त आणि फक्त माझ्या लेखणी मुळेच मिळाली.
मी अबोल आहे जराशी
पण लेखणी माझी बोलते,
मी मितभाषी आहे जराशी
पण लेखणी माझी माझे मौनही हेरते...!
माझ्या मनातले सारे काही कशी गं तू ओळखते?
जे मला शब्दांत ही सांगता येत नाही ते तू,
कागदावर कशी गं गिरवते?
एकांतात ही मज तुझीच ओढ लागते
असल्या सारखी भासते....
तर असं आहे माझं आणि माझ्या लेखणीचं नातं अगदी तुझ्या आणि माझ्या सारखं...
किती बोलते ना मी... बरं बरं आता काही नाही बोलत थांबते इथेच आता.
Thank you so much zindagi to give me a chance to live you...
LOVE YOU ZINDAGI
- अक्षदा
Comments
Post a Comment