गंमत जंमत
लहानपणीची गोष्ट आहे. आम्ही जिथे राहत होतो म्हणजेच कि अजून पण तिकडेच राहत आहोत. मी आणि माझा भाऊ आम्ही जुळे भाऊ . आता लहान असताना एकदम सेम दिसत होतो पण आता थोडा फरक आहे. तर मग एकदा असं झालं कि, बाजूच्या चाळीमध्ये पूजा होती तर मी आणि माझा भाऊ आम्ही गेलो तिकडे पूजेला. प्रसाद घेण्यासाठी लाईन मध्ये उभे राहिलो तर भाऊ पुढे गेला आणि मी त्याच्या मागे राहिलो म्हणजे कि आमच्या मध्ये दोघे जण मध्ये आले . प्रसाद द्यायला एक ताई होती .भाऊ आधी होता तर त्याला तिने दिल प्रसाद आणि जेव्हा माझा नंबर आला तस ती लगेच बोलली कि अरे !! तू परत आलास आताच तर घेऊन गेलास प्रसाद आता परत नाही मिळणार आणि तिने प्रसाद दिला सुद्धा नाही.मी सांगायचा खूप प्रयत्न केला कि आम्ही जुळे भाऊ आहोत पण तिने ऐकलं नाही आणि प्रसाद न घेताच घरी आलो .
अशी हि गोष्ट आयुष्यभर लक्षात राहणारी आहे.
Comments
Post a Comment