तसे सांगेन कधी पुन्हा नव्याने

प्रत्येकाचे क्षण असती सुख दुःखाचे
दु:खाला सारूनी दूर
सुखाचे क्षण स्मरूनी आनंदी राहावे

माझ्याही जीवनी आहेत
असे अनेक किस्से 
पाहता डोकावून मागे दिसते सारे नवे

सांगण्या जरी बसली
तर वेळ काही पूरणार नाही 
तरी जरा वाटते तुम्हां सोबत गावाकडले क्षण वाटावे

आठवती तिकडचे ऊन पावसाळे
मुंबई ही तर इमारतींची
इकडे कुठले मंद वारे

अणवानी सारे रान हिंडणे
झाडाच्या शेंड्यावर चढण्याची शर्यत लावणे
क्षण असे हे कसे विस्मरावे

जाता कोणाच्याही घरी
चटणी भाकरी आवडीने खावी
गावकरी मंडळी माझी प्रेमळ असती सारे

पडली भिंत जरी शाळेची
सावकाश जातो अजूनही
कारण ऐकू येतात तिथून गुरूजींचे धपाटे

अविस्मरणीय क्षण माझे काही इतकेच पुरे नाही
पुस्तकाचे पान उलटावे
तसे सांगेन कधी पुन्हा नव्याने
                        कु. रविना रघुनाथ रिकामे
                             (मुंबई, महाराष्ट्र)

Comments

Popular posts from this blog

The Unforgettable Moments of Life

Worth- Living

एक ख्वाब.......