तु तुर मी पराटी व्.



     मया काऱ्या काऱ्या वावरात,
जस वारल्या चाऱ्यासाठी जस  हिंडते ढोर व् ,
डऊर पाण्याच्या शोधात भटकते शिवार व्,
तसच तुव न मव नात व्,
तु तुर मी पराटी व्.

     फरकाळा झाल्या झाल्या,
जशी कास्तकार वाट पायते मुरगाची,
मले कर्ज एंडरेलखात भेटणं का नाही त्याची, तशीच आस मले तुया भेटण्याची व्,
तु तुर मी पराटी व्.

     कापसाच्या एका वरी मध्ये
जशे तुरीचे दोन तास व्,
तशीच रायते तु मया मनामध्ये
अन डोळ्यात चोवीस तास व्,
तु तुर मी पराटी व्.

     निंगल्या वर  कापुस तुरीचा जसा रायते भाव
कापसाचा क्विंटल ले सहा हजार व्,
तुवा भाव क्विंटल मागे दहा हजार व्,
तशीच तु मया जिंदगीत वरचढ व्,
तु तुर  मी पराटी व्.

     लुटत आहे दलाल अन जिनवाले
कर्जवाले मारते नुसत्या येरजारा व्,
काही फायदा होत नाही पराटी अन तुरीचा,
सध्या उसाले फक्त friendship चा भाव व्
तु तुर मी पराटी व्

सुरज हनुमंते

Comments

Popular posts from this blog

WISH.....

ना पिछे मुड़ना हैं.....

गंमत जंमत